आज दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा

0
6

गोंदिया,दि.२ : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जि.प.समाज कल्याण विभाग व दिव्यांगांच्या शासनमान्य विशेष शाळा/कर्मशाळांच्या संयुक्त वतीने ३ डिसेंबर रोजी पोलीस मुख्यालय मैदान कारंजा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे उदघाटन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे हे करतील. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे असतील. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचे सदस्य तथा उपायुक्त देवसुदन धारगावे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे , प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार. विशेष अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये, शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, महिला व बालकल्याण समिती सभापती विमल नागपूरे उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ४ ते ६ वाजता दरम्यान पोलीस मुख्यालय कारंजा येथे सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके यांनी केले आहे.