संयुक्त संचालकाकडून गोंगले येथील धानपिकाची पाहणी

0
13

गोंदिया,दि.२ : जिल्ह्यात धानपिकावर मोठ्या प्रमाणात मावा तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या धानपिकाची पाहणी करण्यासाठी नुकतीच केंद्र सरकारच्या कृषि विभागाचे संयुक्त संचालक सुकुमार मंडी व कृषि वैज्ञानिक विनयकुमार यांनी सडक/अर्जुनी तालुक्यातील गोंगले येथील धानशेतीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, तालुका कृषि अधिकारी घनश्याम तुमडाम, गोंगलेचे सरपंच डी.यु.रहांगडाले, कृषि सहायक श्री.राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी धानपिकावर तुडतुडा मावा आल्यामुळे शेतीचे संपूर्णत: नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा त्यांनी केंद्र सरकारच्या या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. यावेळी गोंगले येथील शेतकरी विश्वनाथ रहांगडाले, पुरणलाल रहांगडाले, मुन्ना रहांगडाले, मदन येळे, प्रशांत येळे, श्यामराव रहांगडाले, कचरुलाल मरस्कोल्हे, तुलसीदास बिसेन, ओमप्रकाश पटले, ओंकार पारधी यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.