गोठणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन आरोग्य सेवक निलबिंत

0
10
जि.प.सीईओ ठाकरेंची कारवाई
गोंदिया,दि.०२ःगोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रqवद्र ठाकरे यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांला आज २ डिसेंबरला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली असता आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यप्रणालीची पोलखोल उघडकीस आली.दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रश्नांना योग्य उत्तर देण्याएैवजी त्यांच्याशी असोभनिय व्यवहार केल्याप्रकरणी सीईओ ठाकरे यांनी तत्काळ २ आरोग्य सेवकांना निलqबत करण्याचे आदेश दिले.त्यामध्ये आरोग्य सेवक एस.बी.जमदाड व आर.एस.राऊत यांचा समावेश असून या कारवाईने आरोग्य विभागात एकच खळबळ माजली आहे.अतिसंवेदनशील क्षेत्रात गोठणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रात सदैव वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध राहावे यासाठी निवासस्थानाची सोय करण्यात आली आहे.परंतु येथील कर्मचारी हे मनमर्जीने काम करीत असल्याचे सीईओ ठाकरे यांच्या पाहणीदरम्यान आढळून आले.आज शनिवारला सकाळी ९.३० वाजता सीईओ रqवद्र ठाकरे यांनी गोठणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली.त्यावेळी वैद्यकीय अधिकारीही हजर नव्हते.सोबतच आरोग्य सेवकही नव्हते.जेव्हा या आरोग्य केंद्रात २ गर्भवती महिला भरती असतानाही आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी व आरोग्य सेवकाची गैरहजेरी सीईओना खटकली.त्याचवेळी आरोग्य सेवक जमदाड व राऊत हे केंद्रात आले असता त्यांना उशीरा येण्याचे कारण विचारल्यावर समाधानकारक उत्तर देण्याएैवजी टालमटोल करणारे उत्तर दिले.या सर्व प्रकरणानंतर आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी सीईओ ठाकरे यांनी कार्यालयीन अनुशासन पालनात कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांना निलqबत करण्याचे व चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली.