समर्थ विद्यालयाचा कबड्डी संघ जिल्ह्यात प्रथम

0
10
लाखनी,दि.30ः- व्यावसायिक कनिष्ठ आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा सध्या जे. एम. पटेल महाविद्यालय भंडाराच्या मैदानावर सुरू असून गोविंद कनिष्ठ व्यवसाय महाविद्यालय मुलींचा कबड्डी संघ तर समर्थ कनिष्ठ व्यवसाय महाविद्यालय लाखनी मुलांचा कबड्डी संघ जिल्ह्यात प्रथम राहिला.या संघाची निवड विभागीय स्तरावर झाली आहे.विशेष म्हणजे गोविंद कनिष्ठ व्यवसाय महाविद्यालय पालांदूरच्या   संघाने ५०/०५ असा एकतर्फी विजय मिळवत नंदलाल पाटील कापगते महाविद्यालय साकोलीचा पराभव केला. जे म पटेल संघाचा पराभव करीत समर्थ कनिष्ठ व्यवसाय महाविद्यालय लाखनी विभागीय स्तरावर पोहचला. तसेच १०० मी धावणे मुलींच्या सामन्यात गोविंद गोविंद कनिष्ठ व्यवसाय महाविद्यालयाची गायत्री सेेलोकर प्रथम क्रमांक तर समर्थ कनिष्ठ व्यवसाय महाविद्यालय लाखनी येथील लोकेश काळे याने द्विवितीय क्रमांक मिळविला आहे.या सर्व यशाचे श्रेय प्रा. प्रशांत ढोमने, प्रा. नितीन कारवट, प्रा. रुपचंद पटले, प्रा. देशपांडे, प्रा. नागदेवे, प्रा. काशिनाथ मस्के, क्रीडा शिक्षक गोवर्धन गिर्हेपुंजे, प्रा नारायण लुटे, रमेश घोटकर यांना असून विजयी स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, प्राचार्य ताराराम हुमे, प्राचार्य अरविंद रामटेके, किशोर आळे यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.