मुन्नालाल यादव यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

0
10
गोंदिया,दि.01 : प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल शहरातील ७५ वर्षीय ज्येष्ठ धावक मुन्नालाल यादव यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी तसेचे विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मुन्नालाल यादव यांनी आजवर राज्य व राष्टÑीय स्तरावरील अनेक दौड व मॅराथॉन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावली असून क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे नाव राष्टÑीयस्तरावर पोहोचविले आहे. शहरासह जिल्ह्यातील धावपटू व खेळाडूंना प्रोत्साहन व मार्गदर्शनाचे कार्यही ते गेले अनेक वर्षापासून करीत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडा प्रेमी व त्यांच्या शुभचिंतकांकडून अभिनंदन केले जात आहे.