कांगारूचा दुबळ्या अफगाणिस्‍तानवर 275 धावांनी दणदणीत विजय

0
13

पर्थ – विश्वचषकातील 26 व्‍या सामन्‍यात बलाढ्य ऑस्‍ट्रेलिया संघाने अफगाणिस्‍तानवर 275 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्‍यातील विजयानंतर ऑस्‍ट्रोलियाने दक्षिण अफ्रिका आणि भारताचा विक्रम मोडीत काढला आहे. 19 मार्च 2007 रोजी भारताने बरमुडा आणि दक्षिण्‍ा अफ्रिकेने 27 फेब्रुवारी 2015 ला वेस्‍ट इंडिजला 257 धावांनी पराभुत केले होते.ऑस्‍ट्रोलियन संघाने विजयासाठी ठेवलेले 318 धावांचे लक्ष गाठण्‍यासाठी मैदानात उतरलेल्‍या अफगाणिस्‍तान संघाची सुरूवात चांगली झाली. सुरूवातीला अफगाणिस्‍तानने 6 षटकांमध्‍ये 25 धावा काढल्‍या. मात्र काही वेळेतच अफगाणिस्‍तानचा खेळ दोन विकेट पडल्‍यामुळे गडगडला. फगाणिस्‍तानला पाहिला छटका दिला तो उस्‍मान घनीने. 2 धावांवर समाधान मानत घनी तंबूत परतला. दोन शटकानंतर ओपनर जावेद अहमदी याला 13 धावासह तंबुत परतावे लागले. जावेद परतल्‍यानंतर नवरोज मंगलने काही काळ खिंड लढवली. मात्र 33 थावा काढून पाचव्‍या विकेटवर तो बाद झाला.