पाकिस्तानची क्वार्टर फायनलमध्ये धडक

0
8

ऑकलँड- विश्वचषक-2015 मधील 29 व्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 29 धावांनी विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 46.4 षटकात सर्व बाद 222 धावा केल्या. परंतु, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 47 षटकांत 232 धावांचे आव्हान मिळाले.

दरम्यान, सामनात ऐनवेळी आलेल्या पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला 232 धावांचे संशोधित आव्हान स्विकारावे लागले.पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 232 धावांचे लक्ष्य (डकवर्थ लुइस नियमानुसार) ठेवले होते. विजयी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा 33.3 षटकांत 202 धावांवर धुव्वा उडाला. पाकचे गोलंदाज मोहम्मद इरफान, वहाब रियाज आणि राहत अलीने प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतले.
दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका क्विंटन डि कॉकच्या रुपात बसला. कॉकला मोहम्मद इरफानने पहिल्या चेंडूवर आऊट केले. कॉक शून्याचा भोपळा देखील फोडता आला नाही. फाफ डू प्लेसिसने 27 धावा करून तंबूत परतला. पाकचा गोलंदाज राहत अलीच्या चेंडूवर सरफराज अहमदने प्लेसिसचा झेल घेतला.अमलाने 38 धावा करून लगावले 9 चौकार
हाशिम अमलाच्या रुपात दक्षिण आफ्रिकेला तिसरा झटका बसला. अमलाला 38 धावांवर वहाब रियाज याने बाद केले. अमलाने 9 चौकार ठोकले. अमलाच्या पाठोपाठ रिली रोसाउ (6) आणि डेव्हिल मिलर (0) आऊट झाले.
222 धावांतच गुंडाळला गेला पाकिस्तान, डेल स्टेनने घेतले तीन विकेट
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 46.4 षटकात सर्व बाद 222 धावा केल्या. परंतु, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 47 षटकांत 232 धावांचे आव्हान मिळाले. दरम्यान, सामनात ऐनवेळी आलेल्या पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला 232 धावांचे संशोधित आव्हान स्विकारावे लागले.
पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक (59) आणि सरफराज अहमदने (49) सर्वाधिक धावा ठोकल्या. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान फलंदाज डेल स्टेनने तीन तर एबॉट आणि मोर्कलने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.