‘प्रोग्रेसिव्ह’च्या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

0
10

गोंदिया,दि.25ः-येथील श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह इग्लिश हायस्कूलच्या जिमनॅस्टीक चमूची विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेव्दारे जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रोग्रेसिव्हच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी बजावली. या संघात पल्लवी कुथे, युक्ती चौधरी, गुंजन मुनेश्‍वर, वैष्णवी मगर, रुद्रा बरुडे, राम बरुडे, हर्षल पटले, सवयान बैस, तौशीन राजारा, प्राची शहारे यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवउील व संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, सचिव डॉ. निरज कटकवार यांना दिले. त्यांचे प्राचार्य ओ. टी. रहांगडाले, प्राचार्या कुमुदिनी तावाडे, वर्षा सतदेवे, आशा राव, क्रीडा शिक्षिका ज्योती पहीरे, पंकज खैरे, हेमा नायडू, डॉली गजभिये, प्रियंका भरणे, मंगला कटरे, खुशबू बांगडकर, पालेंद्र मेंढे, मुकेश शेंडे, राहूल रामटेके, दिव्यांशू जायस्वाल तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाड्ढयांनी अभिनंदन केले.