क्रीडा विभागाने मिशन शक्तीसाठी जिल्ह्यांची निवड करून खेळाडू तयार करावेत – सुधीर मुनगंटीवार

0
9

मुंबई दि.3:  राज्याचे नाव येत्या २०२४ च्या ऑलम्पिक स्पर्धेत नोंदवले जावे, राज्यातील खेळाडूंनी त्यात सहभाग घेऊन पदके प्राप्त करावीत या उद्देशाने आदिवासी विभागाच्या सहकार्यातून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि इतर मुलांना  मिशन शक्ती अंतर्गत प्रशिक्षण  देण्याची योजना तयार करण्यात आली. क्रीडा विभागाने आणखी तीन चार जिल्ह्यांची निवड करून या जिल्ह्यांना दत्तक घ्यावे व  तिथून ऑलम्पिक २०२४ साठी खेळाडू तयार करण्याचे काम करावे अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी क्रीडा विभागास दिल्या.आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.  यावेळी आमदार संजय सावकारे यांच्यासह क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

भूसावळ तालुका क्रीडा संकुलासाठी ७.६१ कोटी रुपयांची पूरवणी मागणी मागण्यात यावी, त्यास विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात मंजूरी दिली जाईल असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी ही पुरवणी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. मिशन शक्ती यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील रिक्त पदे तत्काळ भरण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.