19 जानेवारीला दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रिड़ा,कला व सांस्कृतिक स्पर्धा

0
11

सर्व शिक्षा अभियानाचा उपक्रम -शिक्षणाधिकारी नरड़ यांची माहिती

गोंदिया,दि.15ः- सर्व सामान्य मुलांप्रमाणे दिव्यांग मुलांना गाता यावे, खेळता यावे, त्यांना आपल्या सुप्त गुणांना समाजासमोर प्रकट करता यावे तसेच स्पर्धेचे नियम समजावे त्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्य दिव्यांग विभागामर्फ़त 19 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 5 वाजे पर्यन्त जिल्ह्यातील दिव्यांग मुलांच्या क्रिड़ा,कला व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन कुडवा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी उल्हास नरड़ यांनी दिली आहे.
सदर स्पर्धेकरीता जिल्ह्यातील 233 दिव्यांग मुलांची निवड करण्यात आली असून 100 मीटर धावणे, 100 मीटर अडथळा धावणे, लांब उड़ी, गोला फेक,चित्रकला, रांगोली व ग्रीटिंग तयार करण्यासह सांस्कृतिक कार्यक्रमात समूह गान,समूह नृत्य,नाटिका, एकल गान व एकल नृत्य अश्या स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत.
या स्पर्धेच्या आयोजनाकरिता शिक्षणाधिकारी यांनी दिव्यांग विभागाचे जिल्हा समन्वयक विजय ठोकने यांच्यासह 19 कर्मचार्यांची नियोजन समिती गठित  केलेली असून समितीच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.सदर स्पर्धेत मूलांचा उत्साह वाढवा यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा,मुख्य कार्यकारी अधिकारी, उपाध्यक्ष, सर्व सभापती व सदस्य तथा पंचायत समितीचे सभापती स्पर्धे दरम्यान भेट देणार आहेत.दिव्यांग मुलांचा उत्साह वाढ़विण्यासाठी सदर स्पर्धेस  शिक्षक व परिसरातील नागरिकांनी भेट द्यावे असे आवाहन शिक्षनाधिकारी उल्हास नरड़ यांनी केले आहे.