लाखनी,दि.07ः- सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात लाखनी तालुक्यात धान पिकाची नासाडी झाली आहे. काही ठिकाणी धान कापलेला असताना शेतात पाणी साचले आहे आणि काही कालावधीत येणारा धानपीक खराब झाला आहे. मोठ्या प्रमानात नुकसान धान पिकाचे आणि शेतीचे झाले असून शेतकरी चिंतातुर झाले आहेत. नेमका धान पीक हाती येण्याच्या वेळी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अशा वेळी चिंतातुर शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळवण्यासाठी लाखनी तालुका काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आणि आंदोलनाच्या शेवटी माननीय मुख्यमंत्री महोदय तथा राज्याच्या मुख्य सचिवांना तहसीलदार महोदय लाखनी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून धानाला हेक्टरी 35 हजार रुपये नुकसान सरसकट भरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे त्वरित करून नुकसान भरपाई द्यावी, पीकविमा तात्काळ शेतकऱ्याला देण्यात यावा, जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावा. वाढत्या महागाईवर अंकुश लावण्याच्या दृष्टीने तातडीने उपाय करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आला आहेत. दिवसभर पार पडलेल्या या ठिय्या आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील गिरेपुंजे, शफीभाई लद्धानी, पप्पूभाऊ गिरेपुंजे, रुपलता जांभुळकर, लाखनी शहर अध्यक्ष विशाल तिरपुडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मिनाक्षी बोपचे, प.स. लाखनीचे उपसभापती मोरेश्वरी पटले, प.स. सदस्य दादुभाऊ खोब्रागडे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष कैलास भगत, रमेश खेडकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत वाघाये आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या आंदोलनाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विशाल तिरपुडे यांनी केले. या ठिय्या आंदोलनाप्रसंगी शफीभाई लद्धानी, पप्पूभाऊ गिरेपुंजे, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सुनील गिरेपुंजे, शहर अध्यक्ष विशाल तिरपुडे, जि. प.सदस्य आकाश कोरे, प.स. सभापती खुशाल गिदमारे, सदस्य पंकज शामकुवर, मोनाली गाढवे, विजय कापसे, माजी जि. प. सदस्य उमराव आठोडे, फाल्गुन पाटील वाघाये, नगरसेवक भोला उईके, नगरसेवक अनिल निर्वाण, माजी सभापती अशोक चोले, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, महादेवजी गायधने, प्रदीप तीतीरमारे, शशिकांत भोयर, धनंजय तिरपुडे, भाऊराव गिल्लोरकर, अशोक देशमुख, सुखदेवजी नागलवाडे, भिकारामजी बागडे, रामुदा अंबादे, देविदास गिरेपुंजे, प्रकाश दुर्गे, सरपंच सुनिता भालेराव, लता बुरडे, कृष्णाजी रोकडे, धनपाल बोपचे, गीता मेहर, सविता गौरे, संध्या धांडे, सिमा बंसोड, नंदू चौधरी, विकास वासनिक, रघुनाथ आत्राम, राजू निर्वाण, लताताई बुरडे, गौरा जीवतोडे, ताराचंद निरगुडे, विठोबाजी कांबळे, शाम शिवणकर, विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन निर्वाण, श्रीराम राऊत, प्रेमलाल कठाने, जितू दोनोडे, हेमंत बडवाईक, अनिल बावनकुळे, कैलास लुटे, दुर्गेश चोले आदी पदाधिकारी तसेच तालुक्यातील संपुर्ण शेतकरी उपस्थित होते.





