सचिन, सौरव, लक्ष्मणचा BCCIच्या सल्लागार समितीत समावेश

0
9

नवी दिल्ली, दि. १ – सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या भारतीय क्रिकेटमधील तीन दिग्गजांचा बीसीसीआयच्या ( भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) सल्लागार समितीत समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली असून बीसीसीआयच्या ऑफिशअल ट्विटर अकाऊंटवरही ही घोषणा करण्यात आली आहे.
क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिनचा तेंडुलकर, टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार सौरव गांगुली आणि अतिशय भरवशाचा तसेच शैलीदार फटकेबाजी करणारा अशी ओळख असणारा व्ही.व्ही.एस. लक्ष्मण या तीन दिग्गजांच्या समावेशामुळे भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना भविष्यात मोठा फायदा होईल. या तिघाही दिग्गजांना एकदिवसीय, कसोटी तसेच टी-२० या तिनही प्रकारच्या सामन्यांचा सेच देशात व विदेशात खेळल्याचा प्रचंड अनुभव आहे. त्यामुळे भारतीय संघाला क्रिकेटच्या तिनही फॉरमॅटमध्ये तसेच विदेश दौ-यात खेळताना फायदा होईल अशी अपेक्षा आहे.