24.8 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home Top News झारखमंडमध्ये मंदिरात चेंगराचेंगरी होऊन ११ भाविक ठार

झारखमंडमध्ये मंदिरात चेंगराचेंगरी होऊन ११ भाविक ठार

0
25

वृत्तसंस्था
रांची, दि. १० – झारखंडमधील देवघर जिल्ह्यात मंदिरात चेंगराचेंगरी होऊन ११ भाविक ठार तर ५० जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
देवघर जिल्ह्यातील बेलाबागन येथील वैद्यनाथ मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. जलाभिषेकासाठी कावडवाले रांगेत उभे असताना काही भाविकांनी रांग तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याने धक्काबुक्की झाली. ज्याचे रुपांतर चेंगराचेंगरीत होऊन ११ भाविकांना आपले प्राण गमवावे लागले तर ५० जण जखमी झाले.