गुरुदेव सेवामंडळाच्या जोगी दाम्पत्याची निर्घृण हत्या

0
10

दरोड्याच्या उद्देशाने खून झाल्याची शक्यता

चंद्रपूर,दि.1 : चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील नांदाफाटा गावातील श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते डाॅ.देवराव जोगी व त्यांच्या पत्नी सुधा जोगी या दाम्पत्याची मंगळवारच्या पहाटे दरम्यान हत्या करण्यात आली घटना आज(दि.1) घडली आहे. दरोड्याच्या उद्देशाने त्यांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.पोलिस अधिक्षक संदिप दिवाण यांनी घटनेचे गांर्भीय ओळखत श्वानपथकाला पाचारण करुन तपासाला गती दिली आहे.दरम्यान या घटनेमुळे नागरिकांत असंतोष उफाळून आला आहे.आली.डॉ. देवराव जोगी आणि सुधा जोगी असं या दाम्पत्याचं नाव आहे. डोक्यावर वार करुन सोमवारी रात्री उशिरा या दोघांची हत्या केल्याचं समोर आले आहे.घरामध्ये असलेले महत्वाचे कागदपत्र आणि रोख रक्कम सोबत घेऊन गेले. घटनास्थळी श्वान पथकाच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.हत्त्येची माहिती परिसरात पसरताच मोठ्या संखेने नागरिकांनी जोगी यांचा निवासस्थानी एकच गर्दी केली.
दरम्यान चंद्रपूर येथील तथागत पंच मंडळ,चोरखिडकी येथे वर्षावासाकरीता असलेले भंते आर्यसुत यांच्यावर सोमवारच्या रात्री 9.30 वाजता दरम्यान 8-10 मुलांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.या मुलांना त्यांनी धुम्रपान करण्यास विरोध केला होता.या दोन्ही घटनामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.