जिल्ह्यात सरासरी ८५९.७ मि.मी. पाऊस

0
9

गोंदिया, दि. १ : जिल्ह्यात १ जून ते १ सप्टेंबर २०१५ या कालावधीत २८३७०.५ मि.मी. पाऊस पडला असून त्यांची सरासरी ८५९.७ मि.मी. इतकी आहे. आज १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण ३३ मंडळात ४८०.९ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी १४.६ मि.मी. इतकी आहे.१ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- ४० मि.मी.(५.७ मि.मी), गोरेगांव तालुका- १०५.८ मि.मी.(३५.२ मि.मी), तिरोडा तालुका- १२६.९ मि.मी.(२५.४ मि.मी), अर्जुनी मोरगाव तालुका- ५.६ मि.मी. (१.२ मि.मी), देवरी तालुका- २६.३ मि.मी.(८.८ मि.मी), आमगांव तालुका- ९०.६ मि.मी. (२२.६ मि.मी.), सालेकसा तालुका- ४९.५ मि.मी.(१६.५ मि.मी) आणि सडक अर्जुनी तालुका- ३६.२ मि.मी.(१२.१ मि.मी) असा एकूण ४८०.९ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी १४.६ मि.मी. इतकी आहे. दुपारी गोंदिया शहरासह जिल्ह्यातील इतर भागात पावसाने काहीतास जोरदार हजेरी लावली होती.या पावसाने शेतीला मात्र लाभ होणार असले तरी तलाव बोड्या अद्यापही भरलेले नसल्याने पुढे काय होईल ही सुुध्दा भिती शेतकरी वगार्त आहे.