पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत

0
7

मुंबई दि. १0- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी मुंबईच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येत असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे आणि मुंबई मेट्रो-2 आणि 7 या टप्प्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, संतोष गंगवार आदी उपस्थित राहणार आहेत.

रविवारी दुपारी 2.30 वाजता मोदी यांचे मुंबई विमानतळावर आगमन होईल. तेथून ते हेलिकॉप्टरने न्हावाशेवा येथे जातील. या ठिकाणी कंटेनर टर्मिलनचे उद्‌घाटन होणार आहे. त्यानंतर दादरच्या चैत्यभूमीवर 4.25 च्या सुमारास पंतप्रधानांचे आगमन होईल. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून दादरच्या इंदू मिल येथे डॉ. आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्यानंतर नरेंद्र मोदी बांद्रा कुर्ला संकुलातील जाहीर सभेच्या ठिकाणी मुंबई मेट्रो 2 आणि 7 च्या टप्प्याचे प्रतीकात्मक भूमिपूजन करतील.