कोरोनामुळे UPSC ने 27 जूनला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता 10 ऑक्टोबरला होणार

0
11

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC)ने देखील 27 जून रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. आता या परीक्षा 10 ऑक्टोबरला घेतल्या जातील.

देशभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे, यासोबतच मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. यामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे अनेक परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या. आता यासोबतच UPSC नेही महत्त्वाचा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. UPSC 2021 ची प्रिलिमनिरी परीक्षा आता 10 ऑक्टोबर घेतली जाईल.

10 ऑक्टोबरला होणार परीक्षा
आयोगाने जारी नोटिफिकेशनमध्ये सांगितले की, ‘कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2021 स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा 27 जूनला घेतल्या जाणार होत्या, मात्र आता ही परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 ला आयोजित केली जाईल.’

गेल्या वर्षीही स्थगित झाली होती परीक्षा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बिघडती परिस्थिती पाहता उमेदवार सोशल मीडियावर सातत्याने परीक्षा स्थगित करण्याची मागणी करत होते. 2020 मध्येही संक्रमणाच्या धोक्यामुळे परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. ज्यानंतर या परीक्षा 31 मे ऐवजी 04 ऑक्टोबर 2020 ला आयोजित करण्यात आल्या होत्या.

यापूर्वी आयोगाने कंबाइंड मेडिकल एक्जाम आणि इतर परीक्षाही स्थगित केलेल्या आहेत. परीक्षांसंबंधीत अधिक माहितीसाठी ऑफिशियल वेबसाइटवर व्हिजिट करु शकता.

देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये किरकोळ वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 632 नवीन रुग्ण आढळले. तर 3 लाख 52 हजार 5 लोक बरे झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून 3.50 लाखांपेक्षा कमी रुग्ण समोर येत होते आणि यापेक्षा जास्त बरे होत होते. काल देशात 4,128 जणांचा मृत्यूही झाला. हा सलग दुसरा दिवस होता. जेव्हा 4 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.