नक्षलवाद्यांनी केली दोघांची हत्या

0
9

गडचिरोली,दि.2-पोलिसांना माहिती दिल्याच्या कारणावरून दोघांची नक्षलवाद्यांनी गोळी मारून हत्या केल्याने अहेरी तालुक्यात खळबळ माजली आहे. अहेरी तालुक्यातील २० किमी अंतरावर असलेल्या देवलमरी वट्रा( खु) या गावातील रहिवासी असलेला चैतराव पोरतेट हा नक्षलसंदर्भात पोलिसांना माहिती देऊन त्यानेच फायरिंग करायला लावली आणि पोलिसांकडून पैसे घेतले त्यामुळे त्याला मृत्युची शिक्षा देत आहोत.

तसेच दूसरा मुकेश आत्राम हा पाच वर्षापासून एसपीओ (special police officer) मध्ये काम करत होता त्यामुळे त्यालाही मृत्युची शिक्षा दिली आहे.नक्षलवाद्यांनी या दोघांची हत्या का केली याचा उल्लेख पत्रक टाकून केला आहे.  या घटनेमुळे दुर्गम आदिवासी गावात दहशत पसरली असून पुन्हा एकदा पोलिसांना मदत करणा-यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.