पालकमंत्र्याच्या गावात कमळ द्वितीयस्थानावर

0
5
सडक अर्जुनी ,दि.2: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राजकुमार बडोले यांचे निवासस्थान असलेल्या सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाला दुसरे स्थानावर समाधान मानावे लागले.या ठिकाणी राष्ट्रवादीने १७ पैकी ५ जागांवर विजय प्राप्त करून आपला झेंडा रोवला आहे. अपक्ष ५ उमेदवार, काँग्रेसचे ३ आणि भाजपाचे ४ उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या ५ विजयी उमेदवारांमध्ये शशीकला टेंभुर्णे, रिता लांजेवार, देवचंद तरोणे, प्रियंक उजवने आणि चंद्रप्रभा मुनिश्वर यांचा समावेश आहे. बाहुबली पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये शिला प्रधान,  बाबादास (बासु) येरोला, महेंद्र मसराम आणि महेश सूर्यवंशी यांचा समावेश आहे. काँगे्रसकडून ज्योती गिNहेपुंजे, रेहान शेख आणि अभय रामलाल राऊत विजयी झाले. तर भाजपकडून जिजाबाई पटोले, गिता शहारे, तारा मडावी आणि दिनेशकुमार अग्रवाल हे विजयी झाले आहेत.