अमरावतीत हॉटेलला आग, एकचा मृत्यू

0
21

अमरावती-राजापेठ पोलिस ठाण्यासमोर असलेल्या हॉटेल इंपेरियलला मंगळवारी पहाटे 3 वाजता भीषण आग लागली. या आगीच्या धुराने एकाचा गुदमरून मृत्यू झाला. हॉटेलचे दहा लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दिलीप चंद्रकांत ठक्कर (वय 55 रा. नागपूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. केबल नेटवर्कचे कामासाठी ते अमरावतीला आले होते व सदर हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. दरम्यान मंगळवारी पहाटे हॉटेलला अचानक आग लागली.
आग लागल्याचे लक्षात येताच पोलिस कर्मचारी धावले, अग्निशमन विभागाचे पथकही पोहचले. आग लागताच हॉटेलच्या खोल्यांमध्ये धूर दाटला. त्यातल्याच एका खोलीत दिलीप ठक्कर होते. जीव गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला. अन्य पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. सर्वांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.