आंध्र प्रदेशातील महापौरांची गोळ्या झाडून हत्‍या

0
5
वृत्तसंस्था
चित्तूर (आंध्र प्रदेश)दि. १७ आंध्र प्रदेशातील चित्‍तूर येथे एका महिला महापौराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. के. अनुराधा असे या महिला महापौरांचे नाव आहे. या गोळीबारात मृत अनुराधा यांचे पतीही जखमी झाल्‍याची माहिती आहे. त्यांना त्‍वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्‍याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
स्‍थानिक माध्‍यमांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मंगळवारी चित्‍तूर महानगरपालिकेच्‍या कार्यालयात तीन जणांच्‍या टोळक्‍याने गोळीबार केला. यामध्‍ये महापौर ठार झाल्‍या असून, पती कातारी मोहन गंभीर जखमी झाले आहेत. एक वरिष्‍ठ डीटीपी नेतेही या गोळीबारात जखमी झाले आहेत.