पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ ‘मिसफायरिंग’

0
7
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. १९ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील ७ रेसकोर्स रोड स्थित निवासस्थानजवळ बुधवारी रात्री एका सुरक्षा रक्षकाकडून चुकून गोळी सुटल्याने एकच गडबड उडाली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री ड्युटी बदलत असताना ही दुर्घटना घडली. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पार्किंग लॉटजवळ ड्युटीवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या एक-४७ मधून लागोपाठ तीनवेळा फायरिंग झाले आणि धावपळ उडाली. गोळीबाराचा आवाज ऐकताच सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी सावध झाले आणि त्यांनी तातडीने घटनास्थली धाव घेतली .