तिरोडा रेल्वे स्थानकावर कोळसा चोरी सुरूच

0
7

 तिरोडा-दि.२३,-रेल्वे स्थानकावर थांबलेल्या मालगाड्यांमधून दगडी कोळशाची चोरी ही नित्याचीच बाब झाली आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) कर्मचारी चोरट्यांना पकडतात व नंतर सोडून देतात. या प्रकारामुळे मालगाड्यांमधून दगडी कोळशाच्या चोरीस वावच मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वी तिरोडा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दगडी कोळशाने भरलेली मालगाडी थांबलेली होती. त्या गाडीच्या डब्यावर दोन इसम चढून भराभर दगडी कोळसा खाली फेकत होते. यात एक महिलासुद्धा होती. या प्रकाराकडे तेथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष होते. मात्र रेल्वेचे कर्मचारी या घटनेपासून अनभिज्ञच होते. हीच बाब पुन्हा आज अनुभवयाला मिळाली. मात्र रेल्वेचे पोलीस कुठे बेपत्ता झाले होते, हे कुणालाही कळले नाही.

जर पोलीसच चोरीसारख्या घटनांना फारशी मोठी बाब समजत नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. माणसच काय महिलासुद्धा मालगाडीवर चढून भराभर कोळसा खाली फेकताना दिसत आहे. यात काही अल्पयवयीन मुलांचाही समावेश आहे. वारंवार होणाऱ्या कोळसा चोरीच्या प्रकारात आरपीएफही दुर्लक्ष करून चोरट्यांना पकडत नाहीत.