वाघीण तीन छाव्यांसह बेपत्ता

0
12

गोंदिया दि.२५: जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातील एक वाघीण आपल्या तीन छाव्यांसह बेपत्ता झाली. याचा शोध वन विभाग, वन्यजीव विभाग व एफडीसीएमद्वारे करणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागझिरा अभयारण्यात अल्फा टी-३ नामक एक वाघीण उन्हाळ्यात आपल्या तीन छाव्यांसह कोका रेंजमध्ये दिसून येत होती. ही वाघीण व छावे जून महिन्यातही दिसून येत होते. त्यानंतर कधीकधी ही वाघीण पावसाळ्याच्या दिवसांत दिसून आली होती. नागझिरा अभयारण्य पावसाळ्यानंतर उघडले जाते. तेव्हापासून आतापर्यंत कोणीही वनपर्यटक किंवा वन कर्मचाऱ्यांना अल्फा व तिचे तीन छावे दिसले नाही. मात्र तिच्या शोधाकडे दुर्लक्ष केले जात आहे. जर अल्फा आपल्या तिन्ही छाव्यांसह दुसऱ्या जंगल परिसरात गेली असेल तर इतर जंगल परिसरातील अधिकाऱ्यांशी संपर्क करून अल्पा व तिच्या तिन्ही छाव्यांचा शोध त्वरित सुरू करणे गरजेचे आहे.