तुमडीकसा जंगलात स्फोटकाचा साठा जप्त

0
13

माओवाद्यांच्या बंद दरम्यान कारवाई : पोलिसांची विशेष शोधमोहिम
गोंदिया, दि. ८ : माओवाद्यांनी २ ते ८ डिसेंबर दरम्यान पीएलजीए अर्थात शहीद सप्ताह पुकारला. यादरम्यान हिसक कारवाया घडवून आणण्याच्या दृष्टीने जंगलांत स्फोटकांचा साठा जमिनीत पुरून ठेवला. पोलिसांनी शोधमोहिमदरम्यान सोमवारी देवरी तालुक्यातील तुमडीकसा जंगलात पुरून ठेवलेला स्फोटकांचा साठा जप्त केला.
पोलिस चकमकीत शहीद झालेल्या माओवाद्यांच्या स्मर्णाथ भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया(माओवादी) या संघटनेच्या वतीने २ ते ८ डिसेंबर दरम्यान पीएलजीए सप्ताह पाळण्यात येतो. या सप्ताहादरम्यान माओवादी सरकारविरुद्ध युद्ध पुकारून घातपात, जाळपोळ आणि इतर qहसक घटना घडवून आणतात. अशाच प्रकारच्या घटना घडवून आणण्याच्या उद्देशाने माओवाद्यांनी महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सिमावर्ती भागात असलेल्या तुमडीकसा जंगलात स्ङ्कोटकांचा साठा लपवून ठेवला होता. शहीद सप्ताहादरम्यान िहसक घटना घडू नयेत, याकरिता गोंदिया पोलिसांनी विशेष  मोहिम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान पोलिस पथक सोमवारी (ता. ७) शोधमोहिम राबवित असताना चिचगड पोलिस ठाणेंतर्गत दूरक्षेत्र गणुटोलाच्या हद्दीतील तुमडीकसा जंगलात जमिनीत पुरून ठेवलेला स्ङ्कोटकांचा साठा पोलिसांच्या हाती लागला. जप्त करण्यात आलेल्या साहित्यात दोन जर्मनचे डबे, लोखंडी क्लेमोर माईन कन्टेनर, युरियासारखा दिसणारे स्ङ्कोटक, पिवळ्या रंगाचे स्ङ्कोटक, खव्यासारखा दिसणारा चिकट स्ङ्कोटक, लाल रंगाचे कॉरटेक्स सारखे दोन तुकडे, इलेक्ट्रीक डिटोनेटर, दोन बॅटरी, लोखंडी खिळे, सळाखीचे तुकडे, लोखंडी बॉलबेरिंग, काचाचे तुकडे, हिरव्या रंगाचे वायर, स्टीलचे ताट, पांढèया रंगाची पोती आणि पॅिकगकरिता वापरण्यात येणारे प्लास्टीकचे तुकडे जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेले साहित्य गडचिरोली-गोंदिया जिल्ह्यात सक्रीय असलेल्या केकेके दलम आणि प्लाटून ५६ च्या माओवाद्यांनी लपवून ठेवले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. चिचगड पोलिसांत यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून जंगलव्याप्त भागात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.