बैलगाडी शर्यतीवर बंदी कायम – सर्वोच्च न्यायालय

0
9

नवी दिल्ली, दि. १२ – सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूतील जलिकट्टू व महाराष्ट्रातल्या बैलगाडी शर्यतींवरील बंदी कायम ठेवली आहे. मागच्या आठवडयात केंद्र सरकारने खेळ, मनोरंजन, खेळांसाठी प्रशिक्षण करण्यास मनाई असलेल्या यादीमधून बैलाचे नाव वगळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तामिळनाडूमध्ये जलिकट्टू व महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अतिशय लोकप्रिय असलेल्या बैलगाडीच्या शर्यतीचा मार्ग मोकळा झाला होता. या निर्णयाला प्राणी मित्र संघटना पेटा आणि बंगळुरुतील एका अशासकीय संस्थेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तामिऴनाडूत जलिकट्टूला परवानही मिळावी यासाठी राजकीयदृष्ट्या प्रेरीत होऊन हा निर्णय सरकारने घेतल्याची टीका होत होती. सर्वोच्च न्यायालयाने तामिऴनाडू, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला यासंबंधी सविस्तर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.