पठाणकोट हल्ल्यानंतर PAK ची मोठी कारवाई, मसूद अझहरला घेतले ताब्यात

0
8
वृत्तसंस्था
नवी दिल्ली – जैश-ए-मोहम्मद चा म्होरक्या मौलाना मसूद अझहरला पाकिस्तानमधील बहापवलपूर येथून ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी करुन ‘जैश’शी संबंधित लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत 12 संशयीत दहशतवाद्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
 पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज सकाळी देशातील सुरक्षेच्या संदर्भात बैठक बोलावली होती. त्यानंतर जैशच्या ठिकाण्यांवर छापेमारी सुरु झाली. सकाळपासून झालेल्या छापेमारीत मसूद अझहर, त्याचा भाऊ रऊफ असगरसह 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.अशी माहिती आहे, की मसूद अझहर, रऊफ आणि त्यांचे दोन साथीदार अश्फाक आणि कासिम पठाणकोट हल्ल्यावेळी हल्लेखोरांच्या संपर्कात होते.
नवाज शरीफ यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात काय म्हटले
– पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला नवाज शरीफ सरकारमधील मंत्री, पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री, परराष्ट्र व्यवहार सल्लागार, ‘आयएसआय’चे डायरेक्टर जनरल, लाहोर कॉर्प्स कमांडर, डीजी इंटेलिजेंस आणि मिलिटरी पोलिससह आणखी काही बडे अधिकारी उपस्थित होते.
– बैठकीत पाकिस्तानमधून दहशतवाद संपवण्यावर आणि पठाणकोट हल्ल्याशी संबंधित लोकांवर योग्य कारवाई करण्यावर चर्चा झाली.
– जैश-ए-मोहम्मदविरोधात मिळालेल्या पुराव्यानुसार या संघटनेचे अनेक कार्यालय सील करण्यात आले असून कारवाई सुरु आहे.
– पाकिस्तान सरकार एक विशेष तपास पथक (SIT) पठाणकोटला पाठवणार आहे, जे तपासात भारताला सहकार्य करेल.
– पठाणकोट हल्ल्याच्या तपासात पाकिस्तान भारताला पूर्ण सहकार्य करेल.