रस्ता सुरक्षा अभियान-नेत्र ,आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

0
6

गोंदिया,दि.१३ : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभागाच्या वतीने १० ते २४ जानेवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान-२०१६ राबविण्यात येत आहे. वाहनचालक, युवक-युवती व सामान्य नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
दि.११ रोजी सीमा तपासणी नाका शिरपूर देवरी तसेच शहरातील मुख्य मार्गावर ज्या वाहनांना रिफ्लेक्टर टेप लावण्यात आले नाही अशा ट्रॅक्टर ट्रेलर व इतर ११२ वाहनांना रिफ्लेक्टीव्ह टेप लावण्यात आले. वाहनाच्या मागील भागात रिफ्लेक्टरमुळे अपघात टाळता येऊ शकतात याबाबत उपस्थित वाहनचालक व मालक यांना मार्गदर्शन करण्यात आले.
दि.१२ रोजी वाहन चालकांकरीता नेत्र तपासणी शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नेत्रतज्ञ डॉ.राजेंद्र अग्रवाल यांनी वाहन चालकांची नेत्र तपासणी करुन मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एन.आर.निमजे, नेत्र चिकित्सक अधिकारी डॉ.पवन काळे, सहायक संजय पारधी, आरोग्य तपासणीसाठी डॉ.योगेश हिरापुरे, डॉ.प्रगती खंडाते, औषधी निर्माता जनार्धन जामवंत, नुतन कठाणे व अधिपरिचारिका उपस्थित होते. रक्तदान शिबिराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉ.गायत्री घाबेकर, डॉ.अनिल गोंडाणे, विणा पारधी, राजु रहांगडाले व हेमंत बिसेन उपस्थित होते.
यावेळी वाहतुक निरीक्षक के.एम.धुमाळ, मोटार वाहन निरीक्षक विशाल भोवते, अशफाक अहमद, परिवहन विभागाचे अनिरुद्घ देवधर, संदिप पवार, प्रभाकर पेन्सीलवार, दिनेश पाटील, पोलीस कार्यालयाचे राजेंद्रसिंह टिकारिया, श्रीधर शहारे, चौधरी, गायकवाड, वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सदगीर, पोलीस नाईक अजय बन्सोड, गागेश्वर उके, पोलीस शिपाई रहांगडाले व ईश्वार उपस्थित होते.