नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ

0
62

नारायणपूर-,छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात Naxals नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा रस्ते बांधणीच्या कामातील वाहनांची जाळपोळ केली. माओवाद्यांनी गुरुवारी दोन वाहने आणि एक मोटार सायकल जाळली.
परिसरात पीएमजीएसवाय रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. कुकडझोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंगला येथे ही घटना घडली. त्याच वेळी, पोलिसांचे म्हणणे आहे की, कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेशिवाय रस्त्याचे बांधकाम सुरू होते.मिळालेल्या माहितीनुसार, ऐराबोर Naxals पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेंडेरा जवळ प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. नक्षलवाद्यांनी रविवारी दुपारी काम बंद पाडले आणि
तेथे बसवलेले रोड रोलर्स, मिक्सर मशीनसह तीन वाहने पेटवून दिली. नक्षलवाद्यांनी रस्ते बांधणीच्या कामात गुंतलेल्या लोकांना धमक्याही दिल्या आणि दुसरीकडे नक्षलवाद्यांना पाहून कोणाचीही बोलण्याची हिंमत झाली नाही.या नक्षलग्रस्त भागात कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना रस्ते बांधणीचे काम सुरू होते.एसपी शलभ सिन्हा यांनी या नक्षलवादी हल्ल्याला दुजोरा देताना सांगितले की,पोलिसांनी आधीच सुरक्षेशिवाय रस्ते बांधणीचे काम न करण्याचा इशारा दिला होता. मात्र, बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी ही घटना घडली.