माझ्या घराला ६ महिन्यांपासून वीज मीटरच नाही”👉शिवसेना आमदाराने सभागृहातच मांडला मुद्दा

0
21

मुंबई :-राज्यातील अनेक भागांत आजही वीजेचा प्रश्न भेडसावत असल्याच्या अनेक तक्रारी तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, आता एक वेगळीच घटना समोर आली आहे.शिवसेनेच्या आमदाराने आपल्या घराला गेल्या सहा महिन्यांपासून वीज मीटरच नसल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी थेट सभागृहातच हा मुद्दा उपस्थित केला आहे.

शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी सभागृहात वीज मीटर आणि वीज कनेक्शनचा मुद्दा उपस्थित केला. अजय चौधरी यांनी म्हटलं, वीजेच्या संदर्भातील प्रश्न आहे म्हणून उल्लेख करतोय… मुख्यमंत्र्यांच्या गावाकडचा विषय आहे. गेल्या एक वर्षापासून महाबळेश्वर तालुक्यात वीज मीटर उपलब्ध नाहीयेत. माझ्या घराला सहा महिन्यांपासून वीज मीटर नाहीये. त्याससोबत सरासरी काढून वीज बिल काढली जातात. ती सरसकट प्रचंड प्रमाणात बिल आकारली जातात. हा डोंगराळ भाग असून येथे कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. त्यामुळे माझे दोन प्रश्न आहेत. मीटर ताबोडतोब उपस्थित करून देणार का? आणि इथले कर्मचाऱ्यांची कमतरता आहे त्याचा बॅकलॉग भरणार का?

शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत म्हटलं, मीटर तातडीने उपलब्ध करुन देण्यात येतील आणि अजय चौधरी यांना वीज मीटर सहा महिने का मिळाले नाहीत हे सुद्धा मी विचारेल. तात्काळ वीज मीटर उपलब्ध करुन देण्यात येतील आणि सर्वांनाच मीटर उपबल्ध करुन देण्यात येतील.

स्टील उद्योगांनी बेकायदेशीर अनुदान घेतल्यास कारवाई

१८ ऑगस्ट रोजी विधानपरिषदेत स्टील उद्योगांनी बेकायदेशीर अनुदान घेतल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. जालन्यातील मे. कालिका स्टील प्रा. लि. या औद्योगिक ग्राहकाने अस्तित्वातील वीज पुरवठा १ जुलै २०१६ रोजी कायमचा खंडीत करून २९ मे २०१७ रोजी त्याच नावाने नवीन वीज जोडणी घेतल्याचे निदर्शनास आले या प्रकरणात आणखी चौकशी करण्यात येईल. या प्रकऱणात दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून वसुली केली जाईल शी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.