राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी:ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वीच होणार खात्यात जमा

0
25

मुंबई-राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषदा त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांची दिवाळी राज्य सरकारच्या एका निर्णयामुळे गोड होणार आहे. राज्य शासनाकडून दिवाळी सणाची मोठी भेट देण्यात आली असून ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वीच करण्यात येणार आहे. हे वेतन आता 21 ऑक्टोबरलाच दिले जाईल.

शासनाची मान्यता

महाराष्ट्र राज्य शासनाकडुन राज्य कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळी सणाच्या अगोदर म्हणजेच 24 ऑक्टोंबरपुर्वी म्हणजेच 21 ऑक्टोबरला वेतन देण्याची मान्यता देण्यात आली आहे. यंदा दिवाळी ही 22 तारखेपासून सुरू होणार असून त्यापूर्वी म्हणजे 21 तारखेलाच सर्व कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे.

असा असेल बोनस

मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना राज्य सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरदार होणार आहे. 22 हजार 500 रूपये, तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाणार आहे.

अग्रीमही मिळणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला. राज्य शासनातील सर्व अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा निर्णय सरकारने घेतला. या कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.

परतफेडीचीही योग्य सोय

सरकारने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट ‘क’ आणि गट ‘ब’ या अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांनाही उत्सव अग्रीम मिळेल. उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी 12 हजार 500 एवढी रक्कम दिली जाणार असून 10 समान हप्त्यात परतफेडीची सोयही करण्यात आली आहे.