बाराफूट बर्फाखाली सापडला जवानाचा मृतदेह

0
7
वृत्तसंस्था
श्रीनगर, दि. २० – जम्मू-काश्मिरच्या कारगिल भागामध्ये हिमस्खलनामध्ये बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह अखेर रविवारी लष्कराच्या बचावपथकाला सापडला. बचाव मोहिमेच्या तिस-यादिवशी लष्कराच्या बचावपथकाला विजय कुमार यांचा मृतदेह बारा फूट बर्फाखाली सापडला.
विजय तामिळनाडूच्या थिरुनवेली जिल्ह्यातील वालारामापूरम गावचे आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. कारगिल सेक्टरमध्ये भूकंपाच्या छोटया धक्क्यानंतर झालेल्या हिमस्खलनात दोन जवान बेपत्ता झाले होते.