केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल,११ नव्या चेहर्‍यांचा संधी मिळणार

0
20

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळात येत्या काही दिवसांत फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विद्यमान मंत्रिमंडळातील किमान 11 मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. येत्या वर्षभरात दहा राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानंतर पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी हा फेरबदल होत असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होत आहे. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत हा विस्तार अपेक्षित आहे. ज्या राज्यांत निवडणुका होणार आहेत तेथील भाजपच्या खासदारांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार असल्याचे कळते. त्याबरोबरच ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नाही त्यांना डच्चू मिळणार आहे.मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांकडे पक्षाची जबाबदारी सोपविली जाणार आहे.