‘डॉ.बाबासाहेब म्हणजे भारतातील पाणी, सिंचन व जलवाहतूक धोरणाचे शिल्पकार’

0
19

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) देशातील पहिली ‘मेरिटाइम इंडिया समिट 2016’ चे उद्घाटन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त अभ‍िवादन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतातील पाणी, सिंचन व जलवाहतूक धोरणाचे शिल्पकार होते, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

 देशातील 7500 किमी लांबीच्या सागरी किना-याला विकासाचा मार्ग बनवण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंदरांच्या विकासासाठी 1 लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं आहे. बंदरांच्या विकासाच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेला गुंतवणुसाठी मोदींनी निमंत्रणही दिलं आहे. ‘मेरिटाइम इंडिया समिट 2016’ च्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
‘सागरीमार्गे येऊन विकास करण्याची ही योग्य वेळ आहे. 2025 पर्यंत बंदरांची क्षमता वाढवण्याचे आमचे ध्येय आहे. बंदरांच्या विकासासाठी 1 लाख कोटींची गुंतवणूक आम्ही करणार आहोत’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. ‘व्यापार, आयात – निर्यात वाढवण्यासाठी अजून पाच बंदर तयार करण्याची योजना सरकार आखत आहे. याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होईल’, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.