5 वर्षांत गुजरातमधील 40 हजारांहून अधिक महाराष्ट्रात तीन महिन्यात ५ हजार ६१० महिला बेपत्ता

0
8

मुंबई/नवी दिल्ली- गुजरातमध्ये गेल्या पाच वर्षांत 40 हजारांहून अधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या आकडेवारीनुसार, राज्यात 2016 मध्ये 7,105, 2017 मध्ये 7,712, 2018 मध्ये 9,246 आणि 2019 मध्ये 9,268 महिला बेपत्ता झाल्या आहेत.2020 मध्ये 8,290 महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे. गेल्या 5 वर्षांत ही संख्या 41,621 वर गेली आहे.

एकीकडे केरळ फाईल्स या चित्रपाटवरुन वातावरण तापलेलं असतांना महाराष्ट्रातली धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. एकट्या मार्च महिन्यामध्ये राज्यातील २ हजार २०० मुली बेपत्ता झाल्या आहेत.तर मागील तीन महिन्यात महाराष्ट्रातून ५ हजार ६१० मुली बेपत्ता झालेल्या आहेत.महिला अयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट केलं आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारने 2021 मध्ये विधानसभेत दिलेल्या निवेदनानुसार, (Gujarat women) अहमदाबाद आणि बडोदा येथे अवघ्या एका वर्षात (2019-20) 4,722 महिला बेपत्ता झाल्या आहेत. 2018 मध्ये, राज्य सरकारने कबूल केले की गेल्या दोन वर्षांत राज्यातील 14,004 महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. तथापि, यापैकी सुमारे 76 टक्के याच काळात सापडल्या देखील होत्या. त्या वर्षांत, दररोज 18 महिला बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. अहमदाबाद आणि सुरतमध्ये सर्वाधिक महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे.

माजी आयपीएस अधिकारी आणि गुजरात राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य सुधीर सिन्हा म्हणाले, काही बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणांमध्ये मुली आणि महिलांना कधीकधी गुजरात व्यतिरिक्त इतर राज्यात पाठवले जाते आणि त्यांना वेश्याव्यवसायात भाग पाडले जाते. पोलिस यंत्रणा हरवलेल्या महिलांची प्रकरणे गांभीर्याने घेत नाही ही समस्या आहे. अशी प्रकरणे खुनापेक्षाही गंभीर असतात. हरवलेल्या व्यक्तींच्या प्रकरणाचा खून प्रकरणाप्रमाणेच कठोरपणे तपास झाला पाहिजे. बेपत्ता व्यक्तींची प्रकरणे ब्रिटिशकालीन पद्धतीने तपासली जात असल्याने पोलिसांकडून अनेकदा दुर्लक्ष केले जाते.

मुलींच्या बेपत्ता होण्याला मानवी तस्करी कारणीभूत असल्याचे मत माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. राजन प्रियदर्शी यांनी व्यक्त केले. बहुतेक हरवलेल्या महिलांना अवैध मानवी तस्करी करणारे गट उचलतात आणि त्यांना दुसर्‍या राज्यात नेऊन त्यांची विक्री करतात असे माझ्या कार्यकाळात मी पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई:-एकीकडे केरळ फाईल्स या चित्रपाटवरुन वातावरण तापलेलं असतांना महाराष्ट्रातली धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. एकट्या मार्च महिन्यामध्ये राज्यातील २ हजार २०० मुली बेपत्ता झाल्या आहेत.तर मागील तीन महिन्यात महाराष्ट्रातून ५ हजार ६१० मुली बेपत्ता झालेल्या आहेत.महिला अयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी राज्यातून मार्च महिन्यात २ हजार २०० मुली बेपत्ता झाल्याचं सांगून गृह विभागाने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करावे, अशी मागणी केली आहे.

मार्च महिन्यामध्ये सरासरी दररोज 70 मुली गायब झाल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे येत आहे. बेपत्ता होणाऱ्या मुलींचं वय १८ ते २५ वयोगटातील आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यामध्ये राज्यातील ५ हजार ६१० तरुणी गायब झाल्या आहेत.मुलींचं बेपत्ता होण्याची कारणं लग्न, नोकरी, प्रेमाचं आमिष अशी सांगितली जात आहेत. फेब्रुवारी महिन्यात १८१० मुली बेपत्ता झालेल्या आहेत.महत्त्वाचं म्हणजे बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश नाही. प्रेम प्रकरण अथवा आमिषाला बळी पडून बेपत्ता झालेल्या मुली, महिला यांची संख्या वाढत असल्याने राज्यासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.

अहवाल सरकारला पाठवला- रूपाली चाकणकर

मागच्या १६ महिन्यात आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. प्रत्येक पोलिस स्टेशनला मीसिंग सेल आहे. तो कार्यरत आहे की नाही? किंवा त्यांचं काम कसं चालतं, हे पाहाणं गृह विभागाचं काम आहे. यासंदर्भातला अहवाल आम्ही राज्य शासनाला पाठवल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. गृह विभागाने याप्रश्नी विशेष पथक स्थापन करण्याची मागणी चाकणकर यांनी केली आहे.