देशप्रेमी ते देशद्रोहीडॉ. प्रदीप कुरुलकरचा प्रवास !आज संपणार पोलीस कोठडी!

0
13

पुणे :-देशाची संरक्षणविषयक संवेदनशील माहिती पुरवल्याचा ठपका ठेवत ‘डीआरडीओ’ संचालक प्रदीप कुरुलकरला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. कुरुलकर सध्या राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या कोठडीत आहे.

विशेष न्यायालयाने त्यास मंगळवारपयर्यंत (दि.8) एटीएस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. आता एटीएसकडून ही पोलीस कोठडी वाढवून मागितली जाण्याची शक्‍यता आहे.

“डीआरडीओ’च्या इंटेलिजन्सने तब्बल सहा महिने पाळत ठेवल्यावर कुरूलकर पाकिस्तानी हेराच्या संपर्कात असल्याचा निष्कर्प काढला. यानंतर मोबाइल आणि लॅपटॉप इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे ताब्यात घेऊन त्याची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली. दरम्यान, कुरुलकर काही हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे. दोन वर्षांपूर्वीच्या त्याचे व्याख्यानाचे फोटो व्हायरल झाले. यामुळे सोशल मीडियावर सरळसरळ दोन विचारसरणींच्या लोकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ सुरू झाला आहे. कुरुलकरच्या लॅपटॉप, तसेच मोबाइलचे तांत्रिक विश्‍लेषण तपास यंत्रणेकडून सुरू आहे. तसेच गुप्तचर यंत्रणेकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पाकिस्तानी हेर आणि कुरुलकर यांची परदेशात भेट झाली होती. त्यांनी हेरांना नेमकी काय माहिती दिली, तसेच पाकिस्तानी मोहजालात कसे अडकले, याबाबतची माहिती घेण्यात येत आहे. कुरुलकरने इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणांद्वारे पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह गोपनीय माहिती दिल्याचे तपासात आढळून आले आहे.

*कौतुकाच्या पोस्ट डिलिट*

कुरुलकर देश, धर्म आणि राष्ट्र यावर व्याख्याने देत असत. त्यामुळे देशभक्त म्हणून समाजात प्रतिमा तयार झाली होती. यातच “डीआरडीओ’चे संचालक झाल्यावर त्यांच्या मित्र परिवार आणि चाहत्यांची मान उंचावली होती. आता अटकेनंतर मित्रमंडळींनी सोशल मीडियावर यापूर्वी टाकलेल्या कौतुकाच्या पोस्ट डिलिट करण्यास सुरुवात केली आहे. तर या कारवाईवर अनेकांचा विश्‍वास बसत नसल्याचे मत आहे.