कोयना धरण परिसराला 4.4 स्केल भूकंपाचा धक्का !

0
9

सातारा, दि. 18  :- पाटण तालुक्यातील कोयना धरणाच्या क्षेत्रात आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 4.4 रि. स्केलचा भुकंपचा सौम्य धक्का बसला. धरणापासून 11. 2 किलोमीटर अंतरावर भूगर्भाच्या 9 किलोमीटर आत या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सातारा, सांगली, कोल्हापूर अन रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागाला हा धक्का जाणवला.