अकोल्यात सर्वोच्च तापमानाची नोंद

0
19
गोंदिया , दि. १८ : मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असतानाच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केल्याने राज्यातील जनजीवन होरपळून निघाले आहे. आज अकोल्यामध्ये हंगामातील सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. २०११ नंतरची ही सर्वाधिक तापमानाची नोंद आहे.राज्यातील तापमानात गेल्या पाच-सहा दिवसांपासून वाढ होत आहे. उपराजधानी नागपूरमध्ये ४४.१,गोंदिया ४१.९,अंश तापमानाची नोंद झाली आहे. प्रमुख शहरांचे तापमान – वर्धा ४६, नागपूर ४४.१, जळगाव ४५.२, परभणी ४४.६, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर ४४.४, नांदेड ४३.५, वाशिम ४३, बुलडाणा, सोलापूर ४३.५, सांगली ४२.३, औरंगाबाद ४१.२, पुणे ४२.४,  सातारा ४१.३, कोल्हापूर ४१.१, नाशिक ४०.४, डहाणू ३५.५, रत्नागिरी ३४.५, महाबळेश्वर ३४, मुंबई ३२.बारामती ४२, भवानीनगरमध्ये ४३अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे