29.8 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home Top News बारामती ॲग्रो कंपनीला सरकारची नोटीस, रोहित पवारांचा २ नेत्यांवर गंभीर आरोप

बारामती ॲग्रो कंपनीला सरकारची नोटीस, रोहित पवारांचा २ नेत्यांवर गंभीर आरोप

0
15

blank

मुंबई,दि.28- ज्याच्या राजकीय वर्तुळातून एक सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीला मध्यरात्री २ वाजता नोटीस देण्यात आली आहे. बारामती ॲग्रो कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवत दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राजकीय सुडापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांच्या कंपनीला मध्यरात्री २ वाजता नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रो कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवत दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याबाबत रोहित पवार यांनी ट्वीट करत माहिती दिली असून दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली… असा गंभीर आरोप त्यांनी केला

काय आहे रोहित पवार यांचे ट्वीट….

दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो… असे रोहित पवार यांनी या ट्वीटमध्ये म्हणले आहे…

मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे.

राजकीय सुडापोटी ही कारवाई…

आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, ही खात्री आहे.