मुंडीकोटा येथील आठवडी बाजारावर मधमाशांचा हल्ला

0
18

तिरोडा- मुंडीकोटा येथे सोमवारला आठवडी बाजार असतो. या आठवडी बाजाराला जवळ जवळ पंधरा ते वीस गावातून नागरिक बाजार करण्यासाठी येत असतात. बाजार चौकामध्ये पाणी टाकीवर मधमाशांच्या पोळे आहेत. त्या मधमाशा अचानक सैरावैरा होऊ लागले आणि त्यामुळे आठवडी बाजारात एकच धांदल उडाली. मधमाशांच्या हल्ल्यामुळे अनेक लोक किरकोळ जखमी झाले. तर दोन-तीन लोक गंभीर सुद्धा झाले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यामुळे संपूर्ण बाजारावरच परिणाम झाला असून अनेकांनी आपले दुकाने सुद्धा बंद केले आणि बाजार करण्यासाठी आलेल्या अनेक नागरिक खाली हातानेच परत गेले असेही दिसून आले. असे मागील दोन आठवड्यापासून होत आहे. करिता स्थानिक प्रशासनाने ते पाणी टाकीवरील असलेले मधमाशांचे पोळे त्वरित काढावी आणि आठवडी बाजार सुरळीत करावा अशी विनंती नागरिका कडून करण्यात येत आहे.