देशाचा कृषीमंत्री सवेंदनहिनशील-सुप्रीया सुळे

0
15

नवी दिल्ली-महाराष्ट्रातील दुष्काळातील परिस्थितीबाबत चिंतेचे वातावरण असताना केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन हे चुकीची माहिती देत असून असवेंदनशील सारखे वागत असल्याची टिका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी व्यक्त केली आहे.केंद्रात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना तत्काळ मदत मिळायची.पथक पाहणीसाठी लगेच यायचे परतु जेव्हापासून केंद्रात भाजप चे सरकार आले तेव्हापासून महाराष्ट्राचे वाईट दिवस आल्याची प्रतिक्रीया दिली.सोबतच शेतकरी हितासाठी आम्ही रस्त्यावर येऊ असेही म्हणाल्या.लोकसभेत आज महाराष्ट्रातील दुष्खाळी परिस्थितीवर उत्तर देतांना कृषी मंत्री राधामोहन यांनी राज्यसरकारवरच खापर फोडले.महाराष्ट्र राज्यसरकारने दुष्काळ असल्यासंबधीची घोषणाच केली नसल्याचे सांगत केंद्र लवकरच पथक पाठविणार असल्याचेही उत्तर दिले.महाराष्ट्राकडून 3 हजार कोटीची मागणी करण्यात आली आहे.दुष्काळी परिस्थितीवर काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनीही केद्राच्या भूमिकेचा निषेध नोंदवित सरकार दुजाभाव करीत असल्याचे म्हटले आहे.विशेष म्हणजे कृषी मंत्र्याच्या उत्तारनंतर भाजप सेनेच्या खासदारांच्याही चेहर्यावर टिकेचे वातावरण निमार्ण झाले आहे.