दोन वाघांचा मृत्यू

0
6

अमरावती –व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागातील चिखलदरा परिक्षेत्रात वैराट जंगलातील दरीत शुक्रवारी एका आठ वर्षीय वाघिणीचा मृतदेह आढळून आला. मागील पाच दिवसांत याच परिक्षेत्रात वाघाच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे.वैराट-पस्तलई जंगलातील हवाखांडी दरीतून काही वनमजुरांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी जाऊन पाहिले. त्यावेळी पठारावर त्यांना मृतावस्थेत वाघीण आढळून आली. ही माहिती त्यांनी वरिष्ठ वनाधिकार्‍यांना दिली. वैराट बिटमधील हवाखांडी वनखंड क्रमांक १८४ मध्ये ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले.