41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या लक्झरी बसची ट्रकला धडक,बसचालक जागीच ठार,15 जखमी

पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या लक्झरी बसची ट्रकला धडक,बसचालक जागीच ठार,15 जखमी

0
226

blank

अमरावती,दि.१५ः– समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या लक्झरी बसची धडक ट्रकला झाली. या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना अमरावतीच्या जवळ असणाऱ्या धामणगावजवळ पहाटेच्या सुमारास घडली. घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत.

समृद्धी महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकला लक्झरी बसची जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात लक्झरी बसचालक जागीच ठार झाला असून बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता.पुणे ते नागपूर  जाणाऱ्या या लक्झरी बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून जवळपास 15 जण यात जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पहाटे घडलेल्या या घटनेनंतर प्रवाशांमध्ये खळबळ आहे.

शहापूरजवळ 5 वाहनांचा विचित्र अपघात; 3 जणांचा मृ्त्यू, 15 जखमी

मुंबई-नाळिर महामार्गावर शहापूरमधील गोठेघरजवळ आज भीषण अपघात झाला. बस ,कंटेनर, ट्रक व टेंपोचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे.सदर अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातात 15 ते 16 जण जखमी झाले असून दोन ते तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस व जीवरक्षक दल दाखल झाले आहेत.

blank