पोर्टब्लेअरला निघालेले विमान बेपत्ता, फ्लाइटमध्ये 29 जण

0
14

नवी दिल्ली – भारतीय वायूसेनेचे विमान बेपत्ता झाले आहे. चेन्नईवरुन पोर्टब्लेअरला हे विमान निघाले होते. मात्र ते त्याच्या निश्चित ठिकाणापर्यंत पोहोचले नाही. विमानात 29 जण आहेत.भारतीय वायूसेनेचे एएन-32 या विमानाने चेन्नईतील विमानतळावरुन पोर्टब्लेअरसाठी उड्डाण केले होते, मात्र काही वेळानंतर त्याच्याकडून कोणतेही सिग्नल मिळाले नाही.या विमानाच्या शोधासाठी वायूसेना, नौदल आणि कोस्ट गार्ड यांनी संयुक्तरित्या सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.