तीन वर्षेाचा वाघ मृतावस्थेत

0
7

रवि पिसे
ब्रह्मपुरी,दि.11 – दक्षिण वनपरिक्षेत्रात मुडझा गावाजवळ बल्लारपूर संरक्षित वनात तीन वर्षे वयाचा वाघ मृतावस्थेत आढळून आला. दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. ब्रह्मपुरी दक्षिण वनपरिक्षेत्रात मुडझा गावालगत बल्लारपूर खासगी संरक्षित वनपरिक्षेत्र आहे. गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांना रात्री हा वाघ मृतावस्थेत आढळला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच बुधवारला वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी भेट दिली. मृत वाघाच्या शरीरावर जखमा आढळल्याने त्याचा झुंजीत मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे. झुंजीतील दुसरा वाघ जखमी असल्याचा अंदाज असल्याने त्याला शोधण्याचे कार्य सुरू आहे.