पांढराबोडी शाळेत आ.जैन वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

0
10

गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्था गोंदियाद्वारा संचालित जीईएस हायस्कूल व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पांढराबोडी येथे गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव आ.राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंदन गजभिये, प्रमुख अतिथी म्हणून निखील जैन, सुनिता राजेंद्र जैन, नितू जैन, डॉली जैन, कपिल जैन, कुडवाचे सरपंच शैलेष वासनिक, गजनलाल सुलाखे, धनलाल लिल्हारे, धुरण लिल्हारे, हरगोविंद चौरसिया, सुनील पटले, डॉ. नितीन तुरकर, प्राचार्य पी.डी. सचदेव प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर शिबिरात ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच इयत्ता दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य सचदेव यांनी केले.
कार्यक्रमात निखील जैन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यालय तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच शैक्षणिक विकासासाठी खा.प्रफुल्ल पटेल आणि संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांच्या आशीर्वादाने नेहमीच चांगल्या कार्यासाठी आ.राजेंद्र जैन यांचे सहकार्य मिळत असल्याचे सांगून रक्तदान करणार्‍या व्यक्तींचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी बाई गंगाबाई रुग्णालयातील डॉ.कांबळे, अनिल गोंडाणे, ए.आर. बाजपेयी, हेमंत रहांगडाले, विनोद बन्सोड, परीक्षित मेश्राम आदींनी सहकार्य केले.
तसेच व्ही.जी. वासनिक, सुनील पटले, पर्यवेक्षक सुदेश शुक्ला, ए.जी. टेंभरे, पी.एच. चव्हाण, नितीन तुरकर, पुरुषोत्तम डोहरे, प्रेम बसेने, निलकंठ भांडारकर, शिमरणदीप होरा, वंजीदर मान, अशोक लिचडे, सतबीर मान यांनी विशेष सहकार्य केले. संचालन विनोद माने तर आभार व्ही.जी. वासनिक यांनी मानले