कारच्या धडकेत 10 वर्षीय मुलगी ठार

0
5

वर्धा : कारच्या धडकेत एका दहा वर्षीच मुलीचा मृत्यू झाला तर तिचा भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी शहरातील तेलीपुरा परिसरात घडली. पुष्पा विजय परतेकी(१०) रा. गोडप्लॉट असे मृतक चिमुकलीचे तर ललित परतेकी(१३) असे जखमीचे नाव आहे.
पोलीस सुत्रानुसार रविवारी सुटी असल्याने ललित आणि पुष्पा हे तेलीपुरा परिसरात सायकलने फिरत होते. दरम्यान एमएच २० सीएच२१७३ या क्रमांकाच्या कारचालकाने या दोघांच्या सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही बहीण भाऊ गंभीर जखमी झाले. दोघांनाही तात्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचाराथ दाखल केले असता उपचारादरम्यान पुष्पाचा मृत्यू झाला. ललित वर उपचार सुरू असून त्याची प्रकृतीही गंभीर असल्याचे समजते.