पालकमंत्र्यांचे हस्ते १५ ऑगस्ट रोजी सायबर लॅबचे उदघाटन

0
9

गोंदिया,दि.१४ : सोशल मिडियाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे घडत आहे. सध्या इंटरनेटच्या माध्यमातून नवनीवन तंत्रज्ञान व उपकरणे वापरुन गुन्हे करण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी गृह विभागामार्फत महाराष्ट्र सायबर लॅब प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयात तयार करण्यात आलेल्या सायबर लॅबचे उदघाटन पालकमंत्री राजकुमार बडोले हे आज १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता करतील. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाने सायबर व महिला अत्याचार शाखेचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या अद्ययावत व सुसज्ज अशा गोंदिया पोलीस सायबर लॅबचे उदघाटन होत आहे. यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहे.