स्वराज्याला सुराज्यात बदलण्याचा सव्वाशे कोटी देशवासियांचा संकल्प-पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
17

नवी दिल्ली – भारताच्या 70 व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करत आहेत.

पंतप्रधानांचे भाषण थोडक्यात –
– एक भारत, श्रेष्ठ भारतचे स्वप्न आम्ही पूर्ण करू
– उपनिषद ते उपग्रह, महाभारतातला भीम ते भीमराव, सुदर्शन चक्रधारी मोहन ते चरखा चक्रधारी मोहन हा भारताचा इतिहास आहे
– भीमपासून भीमरावरपर्यंत भारताचा इतिहास, देशाचा इतिहास हजारो वर्ष जुना आणि समृद्ध आहे
– सरदार पटेल यांनी देशाला एक बनविले, आता आपल्याला श्रेष्ठ करायचे आहे
– वेद ते विवेकानंदांपर्यंतचा भारताचा प्रवास आहे
– अगणित महापुरुषांचा स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष,त्यामुळे आपण आज मोकळा श्वास घेत आहे
– स्वराज्याला सुराज्यामध्ये परिवर्तन करण्याचा संकल्प देशवासियांनी केला पाहिजे.
– आशा आणि अपेक्षा असतील तरच सुराज्याकडे आपण जाऊ शकतो.
– एक काळ होता जेव्हा देशातली सरकारं आरोपांनी घेरलेलं असायची, पण आमचं सरकार अपेक्षांनी घेरलेलं आहे
– गेल्या दोन वर्षांत आम्ही जनतेची कामे केली
– काम करण्यासाठी नियत आणि जबाबदारीची गरज आहे
– हे वर्ष संकल्प पर्व असणार आहे
– चांगल्या कारभारासाठी सरकार संवेदनशील असणे गरजेचे होते
– देशात समस्या खूप आहेत, मात्र समस्या असल्यानेच समाधान आहे
– आता एका मिनिटांत 15 हजार रेल्वे तिकीट मिळतात
– आमच्या सरकारने महागाई नियंत्रित केल्याने गरिबांना दिलासा मिळाला
– आधीच्या सरकारच्या काळात महागाईचा दर 10 टक्क्यांवर होता, मात्र आम्ही हा दर 6 टक्क्यांवर जाऊ दिला नाही
– प्रत्येकाने आपल्या घरात एलईडी बल्ब लावून वीजेची बचत करावी तसेच पर्यावरणाचेही रक्षण करावे
– देशातील १८ हजार गावांपैकी १० हजार गावात वीज पोहोचल्याचे सांगताना मला आज अतिशय आनंद होत आहे. आम्ही २१ कोटी लोकांना जनधन योजनेशी जोडून असंभव काम संभव करुन दाखवले
– अतिशय कमी वेळात देशातील गावात 2 कोटीहून अधिक शौचालये बनली आहेत
– कायद्याचे जंजाळ लोकांसाठी अडचणीचं ठरतं आहे, आम्ही त्यात सुसुत्रीकरण करत आहोत, कायदे कालसुसंगत बनवत आहोत – पंतप्रधान मोदी
– ६० वर्षांत केवळ १४ कोटी गॅस कनेक्शन देण्यात आली होती. मात्र आता ६ आठवड्याच ४ कोटी गॅस कनेक्शन देण्यात आली. देशातील ७० कोटी नागरिकांना आधारशी जोडले – पंतप्रधान मोदी
– क आणि ड वर्गातील तब्बल ९ हजार सरकारी पदांसाठी मुलाखतीची पद्धत रद्द केली आहे. थेट भरतीमुळे पारदर्शकता आली आहे. 9 हजार पदांसाठी मुलाखत न घेता तरुणांसाठी नोकरीची संधी देण्यात आली
– यापूर्वी दिवसाला ७० ते ७५ किमीचे रस्ते बनत होते, आमच्या सरकारच्या कार्यकाळात दिवसाला १०० किमी रस्ते बनवण्यात आम्ही यशस्वी ठरत आहोत- पंतप्रधान मोदी
– देशात लाखो अडचणी आहेत, पण त्यावर उपाय शोधणारी सव्वाशे कोटी जनता आहे. आज मध्यमवर्गीलाही पासपोर्ट मिळवणं सोप्प झालं आहे, आता अवघ्या आठवडाभरात पासपोर्ट मिळतो,2015-16 या वर्षात आम्ही पावणे दोन कोटी पासपोर्ट दिले – पंतप्रधान मोदी
– तंत्रज्ञानाच्या जोरावर आज एका मिनिटात 15 हजार रेल्वे तिकीट मिळणं शक्य झालं आहे. केवळ योजनांच्या घोषणांमुळे आता जनता समाधानी होत नाही – पंतप्रधान मोदी
– गेल्या २ वर्षात सरकारनं एवढी असंख्य कामं केली आहेत, की त्याचा पाढा वाचायचा म्हटलं तर लाल किल्ल्यावरुन मला आठवडाभर बोलत बसावं लागेल – पंतप्रधान मोदी
– आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर व्यवस्थेत अनेक सकारात्मक बदल झाले – पंतप्रधान मोदी
– गेल्या दोन वर्षांत अनेक चांगली काम केली. कामं करण्यासाठी नियत आणि जबाबदारीची जाणीव हवी. चांगल्या कारभारासाठी सरकारने संवेदनशील असणे गरजेचे – पंतप्रधान मोदी.
– एक कालस असा होता जेव्हा सरकार अनेक आरोपांनी घेरलं गेलं होतं. मात्र आमचं सरकार अपेक्षांनी घेरलेलं आहे – पंतप्रधान मोदी
– आपल्या देशात अनेकविध समस्या असल्या तरी आपल्याकडे सव्वाशे कोटी देशवासियांची शक्तीही आहे. प्रत्येकाने आपापला भार उचलून या समस्यांशी लढा देऊन देशाला सुराज्य बनवले पाहिजे – पंतप्रधान मोदी
– पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, महात्मा गांधी, डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या कार्याचे पंतप्रधानांनी केले स्मरण. आपल्या स्वराज्याचा सुराज्यात परिवर्तन करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून सुराज्य बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.