विजय रहांगडाले :कवलेवाडा ते बॅरेज रस्त्याचे भूमिपूजन

0
9

तिरोडा : धापेवाडा उपसासिंचन योजना टप्पा २ अंतर्गत कवलेवाडा ते बॅरेजपर्यंत पोच रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते पार पडले.
या वेळी आ. रहांगडाले यांनी सांगितले की, रस्त्याचे हस्तांतरण जि.प. बांधकाम विभागाद्वारे धापेवाडा उपसा सिंचन योजनेला करण्यात आले होते. रस्त्याचा उपयोग सोमा इंटरप्राईजेस द्वारे बॅरेजचे बांधकाम साहित्य ने-आणकरिता तसेच अदानी पॉवरच्या कामासाठी मोठय़ा प्रमाणात करण्यात येत होता. या जड वाहतुकीच्या वर्दळीमुळे रस्त्याचे होत असलेले नुकसान, त्यावेळेस रस्त्याची दुरुस्ती व डागडुजी सोमा इंटरप्राईजेस द्वारे बांधकाम अवधीमध्ये केल्यामुळे भरुन निघत होते. परंतु त्यावेळी रस्त्याची मजबुती करण्यात आली नाही.
सन २0१४ ला बॅरेजचे काम पूर्ण झाले. त्यातच बॅरेजचा रस्ता सार्वजनिक रहदारीकरिता खुला करण्यात आला. त्यामुळे तिरोडा ते सिहोरा या गावामध्ये रहदारी प्रचंड वाढली. परिवहन मंडळाने बसेस सुरू केले. पण रस्त्याची डागडुजी व दुरुस्ती नसल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी खराब झाला. लोकांचे आग्रह असल्यामुळे व रहदारीमध्ये अडचणी असल्यामुळे सदर रस्ता नियोजनामध्ये घेऊन त्यास मंजूर करण्यात आले व इतर बुडीत रस्ते व पुलाच्या कामास मंजुरी देण्यात आली.
करटी खु. येथे ख. क्र.१४९ ते ३२ मध्ये शेतावरील पोच रस्त्याचे काम ४0.४0 लाख, मरारटोला ते करटी पांदन रस्त्यावरील बॉक्स टाईप पुलाचे काम ५१.३८ लक्ष, मरारटोला ते मामा भाचा देव गावरस्त्यावर बॉक्स टाईप पुलाचे काम ४८.३६ लाख, मरारटोला ते करटी इं.जि. मार्गावरील बॉक्स पाईप पुलाचे काम ९१.९ लाख, मरारटोला येथे ख.क्र. ३७५ ते ३६३ पर्यंत शेतातील पोच रस्त्याचे काम १७.७७ लाख, मरारटोला येथे ख.क्र. ३८0 ते ३६५ पर्यंत शेतावरील पोच रस्त्याचे काम ६९.८२ लाख, करटी खुर्द येथील येथे ख.क्र. १११ ते १0२ पर्यंत शेतावरील पोच रस्त्याचे काम १२.२१ लाख ही कामे लगेच सुरू होणार आहेत.
कवलेवाडा ते बॅरेच पोच रस्त्याचे भूमिपूजन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आ . भजनदास वैद्य होते. याप्रसंगी प्रामुख्याने पं.स. सदस्य डॉ.बी.एस.रहांगडाले, पं.स. सदस्य रमणीक सयाम, पं.स. सदस्य पवन पटले, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, अध्यक्ष भाजपा महिला आघाडी तुमेश्‍वरी बघेले, भाजप शहर अध्यक्ष सलामभाई शेख, धीरज बरियेकर, सारंग मानकर, सरपंच देवन पारधी, जयसिंग उपासे, माजी सरपंच शिवलाल परिहार, महादेव कटणकर तसेच मोठय़ा संख्येने गावकरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.